Posts

Showing posts from March, 2021

अलंग मदन "कुलंग"

Image
    २०२० मध्ये महाशिवरात्री च्या सुमारास बा रायगड परिवारासोबत अलंग मदन आणि कुलंग च्या भेटीला पहिल्यांदा आलो. तेव्हा अलंग आणि मदन तर सर केला पण कुलंग च्या पायऱ्यांपर्यंत येईपर्यंत खूप जास्त दमलो होतो त्यामुळे कुलंग सर नं करताच परत आलो होतो. अलंग आणि मदन सारखे कठीण किल्ले सर केले पण त्यामानाने सोप्पा असलेला कुलंग नाही केला म्हणून बरीच चेष्टा सहन केली आणि हे सुरू असतांनाच २०२१ मध्ये बा रायगड परिवाराची पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्याच दुसऱ्या दिवशी असणारी अलंग मदन कुलंग मोहीम जाहीर झाली. बस्स ठरवलं यावेळी कुलंग करायचा आणि ते पण अलंग आणि मदन सहित. मोहिमेच्या १५ दिवस आधी मोहीम शुल्क भरून जागा नक्की केली. ऐन मार्च मध्यात ही मोहीम असल्याने उन्हाचा तडाखा बसणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली. आवश्यक ती खरेदी करून ११ मार्च ची आतुरतेने वाट पाहू लागलो. अखेर तो दिवस उजाडलाच. ११ मार्च च्या रात्री किसन दादांसोबत बाईक वरून ठाणे गाठले आणि तिकीट काढून प्लॅटफॉर्म नंबर १ वर ट्रेन ची वाट बघत बसलो. थोड्याच वेळात राणे दादा आणि आणखी दोघे सुद्धा आमच्यात येऊन सामील झाले. ट्रेन यायला काहीच वेळ शिल्लक होता आण...

असावा गडसंवर्धन मोहीम

Image
  नोव्हेंबर २०२० पासून बा रायगड परिवारासोबत किल्ले असावा गडसंवर्धन मोहिमेत सहभाग घ्यायला सुरुवात केली, त्यानंतर ही आजची माझी चौथी मोहीम. दहिसर ते बोईसर असा ट्रेन चा तर बोईसर ते बरीपाडा असा रिक्षा चा प्रवास करून रात्री १२:३० च्या सुमारास मामांच्या घरी पोहोचलो. केतन दादा, वैभव मोरे दादा, विनायक दादा आणि आणखी बरीच मंडळी आमच्या आधी पोहचून मॅगी वर तुटून पडली होती. मी, कुलदीप, विजय दादा, सिद्धार्थ दादा, सुरज दादा आणि तन्मय दादा पोहोचलो तेव्हा परिवरातल्या रोशन दादा च्या वाढदिवसानिमित्त केक कापून "आगळ्या वेगळ्या पद्धतीने" वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करुन झाल्यावर आम्ही शिल्लक राहिलेल्या आणि कळशीभर पाणी प्यायलेल्या मॅगी वर हल्ला चढवला आणि पोहे चहा साठी लागणार जिन्नस आणि संवर्धन कार्यासाठी लागणारी शस्त्र घेऊन १:३० वाजता गडचढाईला सुरुवात केली. अर्ध्या तासात पहिल्या पठारावर पोहोचलो आणि तिथे पहिला छोटा ब्रेक घेतला. पुढे चालायला सुरुवात केली तेव्हा पुढे केतन दादा, कुलदीप आणि काही मंडळी होती आणि त्यांच्या मागून आम्ही ४-५ जण चालत होतो. पुढच्या १० मिनिटांत पुढची मंडळी थोडी पुढे न...