काही महत्वाच्या सूचना…
गिर्यारोहकांनी ट्रेकिंग करताना खाली नमूद केलेल्या बाबींचे पालन करणे महत्वाचे आहे. १. कठीण श्रेणी चे ट्रेक्स करताना एकटे जाणे टाळा, मुंबई-पुण्या सहित अनेक शहरांमध्ये नामांकित ट्रेकिंग ग्रुप आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ट्रेक्स करा. २. ट्रेक करताना किमान एक व्यक्ती असा सोबत असावा ज्याला रस्ते आणि त्या रस्त्याबातात योग्य माहिती असेल. ३. ट्रेक ला जाताना ३-५ लिटर पाणी सोबत ठेवा. ४. चढाई करताना कमीत कमी पाणी पिण्याचा प्रयत्न करा. ५. जर चढाई करताना धाप लागली तर थोडा वेळ थांबा पण शक्यतो त्या ठिकाणी बसणे टाळा आणि जर बसलात तर जास्तीत जास्त ५ मिनिटे बसा. ६. ट्रेक ला जाताना jeans, shirt असे घट्ट कपडे परिधान करणे टाळा, शक्यतो T -Shirt, shorts, track paints असे सैल कपडे घाला. ७. ट्रेक ला जाताना मौल्यवान वस्तू उदा. सोन्याची चैन, सोन्याची अंगठी नेऊ नका आणि नेलीच तर सोबत असलेल्या bag मध्ये ठेवा. ८. सोबत माचिस बाळगा. याचे कारण असे कि ट्रेक्स बहुतेक वेळा जंगल वाटेने करावा लागतो, त्यामुळे या परिसरात मधमाश्यांचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माचिस जवळ असल्यास आजूबाजूचा...