Posts

राजधानी ते राजधानी

Image
राजधानी ते राजधानी म्हणजेच स्वराज्याची पहिली राजधानी दुर्गराज राजगड ते दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड ट्रेक व्हाया तोरणा. आयुष्यात एकदा तरी हा ट्रेक करावा हे प्रत्येक भटक्याचं स्वप्नं असतं तसंच ते आमचं सुद्धा होतं पण तो योग या कोरोना महामारीच्या २०२० मध्ये जुळून येईल असं अजिबात वाटलं नव्हतं. आमच्या ध्यानी-मनी नसतांना सरत्या दिवाळीत रोह्याच्या शुभम चा मेसेज आला की डिसेंबर मध्ये राजगड-तोरणा-रायगड करायचा. हो नाही करत रोह्यातून शुभम, संकेत आणि आदर्श तर मुंबई मधून मी, प्रणव आणि योगेश असं ६ जणांचं जायचं नक्की झालं आणि तयारी सुरू केली. इतका मोठा पल्ला गाठायचा म्हणजे हाताशी ३ दिवस हवेत आणि तशी ३ दिवसाची सुट्टी २५-२६-२७ डिसेंबर ला आयती चालून आलेली. २६ तारीख च्या सुट्टीचं कन्फर्म झालं आणि झाडावरून पान अलगद खाली पडावं तसं "२७ तारीख ला माझं pre-wedding शूट आहे" सांगून योगेश अलगद बाजूला झाला. सदस्यसंख्या ६ वरून ५ वर आली. बोराटा नाळ की सिंगापूर नाळ या चर्चेत २ दिवस गेले. शेवटी सर्वानुमते बोराटा नाळेने उतरायचं ठरलं.  ३ दिवसाच्या जेवणाचं साहित्य सोबत न्यायचं ठरलं होतं पण ते खुपचं त्रासद...

अलंग मदन "कुलंग"

Image
    २०२० मध्ये महाशिवरात्री च्या सुमारास बा रायगड परिवारासोबत अलंग मदन आणि कुलंग च्या भेटीला पहिल्यांदा आलो. तेव्हा अलंग आणि मदन तर सर केला पण कुलंग च्या पायऱ्यांपर्यंत येईपर्यंत खूप जास्त दमलो होतो त्यामुळे कुलंग सर नं करताच परत आलो होतो. अलंग आणि मदन सारखे कठीण किल्ले सर केले पण त्यामानाने सोप्पा असलेला कुलंग नाही केला म्हणून बरीच चेष्टा सहन केली आणि हे सुरू असतांनाच २०२१ मध्ये बा रायगड परिवाराची पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्याच दुसऱ्या दिवशी असणारी अलंग मदन कुलंग मोहीम जाहीर झाली. बस्स ठरवलं यावेळी कुलंग करायचा आणि ते पण अलंग आणि मदन सहित. मोहिमेच्या १५ दिवस आधी मोहीम शुल्क भरून जागा नक्की केली. ऐन मार्च मध्यात ही मोहीम असल्याने उन्हाचा तडाखा बसणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली. आवश्यक ती खरेदी करून ११ मार्च ची आतुरतेने वाट पाहू लागलो. अखेर तो दिवस उजाडलाच. ११ मार्च च्या रात्री किसन दादांसोबत बाईक वरून ठाणे गाठले आणि तिकीट काढून प्लॅटफॉर्म नंबर १ वर ट्रेन ची वाट बघत बसलो. थोड्याच वेळात राणे दादा आणि आणखी दोघे सुद्धा आमच्यात येऊन सामील झाले. ट्रेन यायला काहीच वेळ शिल्लक होता आण...