वाळवाचा पाऊस.........
मे महिना नुकताच संपत आलेला. मे महिना म्हणजे तसं सुट्टीचा, मुलांच्या परीक्षा संपेलेल्या असतात. मग काय नुसता धुडगूस असतो मुलांचा मातीत. तशी आजकाल ची मुलं दिवसभर मोबाईल कॉम्प्युटर ह्यात गुंतलेली असली तरी आमच्या लहानपणी मे महिना म्हणजे बॅग भरन गावी पळायचं आणि मस्त उनाडक्या करायच्या. लहानपणी गावी असताना जसा चातक पक्षी वाट पाहतो तसे आम्ही पावसाची वाट बघायचो. मान्सून पूर्व पाऊस म्हणजे वाळवाचा पाऊस जेव्हा पडायचा, तेव्हा मस्त मातीचा सुगंध एखाद्या कस्तुरी मृगा सारखा यायचा. तो सुगंध मनात अगदी कायम साठी साठवून ठेवावा असांच. वाळवाचा पाऊस म्हणजे मस्त निसर्गाची लपाछपी अचानक ढग एकदम आकाश अच्छादून टाकायचे तर कधी संपूर्ण आकाश एकदम निरभ्र व्हायचं. पहिल्या पावसामुळे आमच्या मातीच्या मैदानात चिखल व्हायचा मग तो संपूर्ण चिखल जमिनीवरून कधी अंगावर यायचा हे कळायचं नाही. त्यात अबधुबी, लगोरी अगदी मनमुरादपणे खेळायचो. पहिल्या पावसामध्ये जमीनीने सामावून घेतलेले सर्व तापमान बाहेर यायचं मग खूप उकडायला व्हायचं. त्यात साप आणि विंचू सारखे पाहुणे भेटीला यायचे. लहानपणी घरचे सांगाय...