सरळ आणि सोपा लोहगड...
२०१५ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात आमच्या रावा म्हणजेच "राव आमचं वेगळं आहे" या फेसबुक ग्रुप कम कुटुंबाने सर्व सभासदांना घेऊन लोहगड सर करायचा प्लान केला होता. माझ्या आयुष्यातला हा दुसराच ट्रेक होता म्हणून माझी उत्सुकता आधीच शिगेला पोहोचली होती. नेहमी प्रमाणे आधी माझं नक्की नव्हतं आदल्या दिवशी माझं येन मी नक्की केलं. बाकी मेंबर्स चं जाणं नक्की होत त्यामुळे त्यांचं reservation आधीच करून ठेवलं होत आणि मला आयत्या वेळी reservation नाही मिळालं. रात्री कळलं कि मीनाक्षी सुद्धा येणारेय आणि तिचं पण reservation नाही. मग तिच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही दोघांनी general ने जायचं ठरवलं. सकाळी लवकर उठून सी.एस.टि. गाठलं आणि २ general च्या तिकीट काढून आम्ही आमच्या जागी जाऊन बसलो. थोड्याचं वेळात ट्रेन पुण्याकडे मार्गस्थ झाली. दादर आणि ठाण्याला आमची बाकीची मंडळी सुद्धा ठरलेल्या जागी विराजमान झाली. सकाळच्या वेळी अंधार कापत आमचा रथ पुढे जात होता. कर्जतला मस्त दिवाडकरांच्या वडापाव वर यथेच्छ ताव मारला. आणि ठरल्या वेळी लोणावळा स्टेशन ला पोहोचलो सुद्धा. लोणावळा वरून आम्हाला लोकल ने एक स्टे...