पुन्हा एकदा हरिश्चंद्रगड!!
२०१७ च्या शेवटी म्हणजे ३० डिसेंबर शनिवारी रात्री आम्ही साडे नऊ भटके ट्रेक साठी निघालो. हो साडे नऊ कारण यावेळी आमच्या सोबत साथ करायला ७ वर्षाची अनन्या सोबत होती. तर कल्याण वरून संध्याकाळच्या ७ च्या अहमदनगर एस.टी. मध्ये विसावलो ते ट्रेकर्स ची पंढरी असणाऱ्या हरिश्चंद्रगडाकडे जाण्यासाठी. कल्याण च्या ट्राफिक मधून वाट काढत आणि बस मध्ये असलेल्या कंडक्टर काकांसोबत राम कृष्ण हरी म्हणत साधारण ९:३० वाजता खुबी फाट्या ला उतरलो.
अजिबातच वेळ वाया नं घालवता खिरेश्वर कडे चालायला सुरुवात केली.
रात्री ची वेळ आणि थंडीच्या दिवसात ती पिंपळजोगा धारणावरची वाट खरंच खुप सुंदर होती. थोड्याफार चांदण्यात टोलार खिंड आणि त्याच्या बाजूला असलेला बालेकिल्ला आपलं अस्तित्व दाखवून देत होता. रमत गमत आणि गप्पा मारत आम्ही साधारण साडे दहा वाजता मारुती दादा च्या घराजवळ पोहोचलो. आमच्याकडची आम्ही सोबत आणलेली maggie आम्ही मारुती दादाकडे शिजवायला दिली आणि अश्या कडाक्याच्या थंडीत चहा ची तल्लफ भागवायला सांगितली. संध्याकाळी घरून निघाल्या पासून काही खाल्लं नसल्यामुळे आणि जेवणाची वेळ होऊन गेल्यामुळे सगळ्यांनीच पुढ्यात आलेल्या maggie आणि चहा वर मनसोक्त ताव मारला.
आम्ही रात्री गड चढायचा हे मारुती दादा ला सांगून ठेवलं होतं आणि त्यानुसार त्याने गावातला वाटाड्या आधीच आपल्या घरी बोलवून ठेवला होता. चहा maggie चा कार्यक्रम उरकून आणि बर्यापैकी आराम करून साधारण १२:३०-१:00 च्या दरम्यान आम्ही टोलार खिंडीतून आमची पायपीट सुरू केली. आवश्यक तितक्याच बॅग्स आणि सामान सोबत घेतलं आणि बाकीचं मारुती दादाच्या घरात ठेऊन दिलं कारण उद्या इथूनच उतरायचं ठरलेलं.
लहानगी अनन्या आधी उत्सुक नव्हती चालायला पण नंतर उन्मेशा सोबत गप्पा गोष्टी करत निवांत चालत राहिली.
रमत गमत साधारण तासाभरात जंक्शन ला पोहोचलो जिथे कोतुळ ची वाट समोरून येऊन मिळते. इथंच एक वाघ्रशिल्प कोरलेलं आहे. दिवसा येतो तेव्हा इथं लिंबू सरबत आणि काही फळं विकायला काही माणसं बसलेली असतात पण आता रात्री ची वेळ असल्याने आम्ही आमच्याकडचा खाऊ खायला बसलो सोबत मुबलक पाणी असल्याने पाण्याची चिंता नव्हतीच.
या वाघ्रशिल्पा च्या अगदी समोरून कोतुळ ची वाट येऊन मिळते तर डाव्या बाजूला टोलार खिंड सुरू होते. टोलार खिंडीची चढाई दम काढणारी असल्यामुळे इथंच थोडा मोठा ब्रेक घेऊन निघालो.
डावीकडे वळल्यावर दोन मिनिटांतच खिंड सुरू झाली. खिंडीच्या सुरुवातीला काही रेलिंग्स लावलेले आहेत, त्याच्या आधाराने एकेकाला वर चढवलं. आमच्यापैकी मी सोडलं तर टोलार खिंडीतून कोणी आलं नव्हतं आणि बाकीच्यांना खिंडीच्या बाजूला असलेल्या दारीबद्दल कल्पना नव्हती त्यामुळे सगळे निर्धास्त चढत होते. पुढे रेलिंग्स चा आधार संपला तेव्हा एकेकाला हात देत आणि छोट्या अनन्या ला सांभाळत सावकाश खिंड पार केली.
खिंड पार केल्यावर एका ठिकाणी पंकज चा पाय घसरला, सुदैवाने लागलं नाही पण पंकज च्या मते तो सहज बसला होता😂😂 तिथं, पठ्ठा मानायला तयार नाही की त्याने नमस्कार घातलाय. पंकज चं पडणं सावधानतेचा इशारा मानून खिंड संपल्यावर जिथे एक शॉर्टकट आणि दुसरी सात टेकड्यांची वाट एकत्र येते त्या जंक्शन ला एका झोपडीत स्थिरावलो आणि सर्वानुमते थोडा मोठा ब्रेक घ्यायचं ठरवलं.
ब्रेक घेतल्या घेतल्या पंकज अनन्या आणि अनन्या ची मम्मी अर्थात रूपा दि या तिघांनी तिथेच शेकोटी पेटवली होती त्यापासून थोड्या अंतरावर पडी टाकली.
बाकीचे आम्ही बसून गप्पा मारत होतो. आत्ता पर्यंत चढत असल्याने शरीर गरम राहत होतो त्यामुळे थंडी जाणवत नव्हती पण त्या ब्रेक मध्ये थोड्याच वेळात थंडी ने तिचं अस्तित्व दाखवून दिलं. वाढत्या थंडी चा अंदाज घेऊन शेकोटीजवळ गप्पा मारत बसलो. साधारण ४:३० च्या दरम्यान सगळ्यांना जबरदस्ती उठवलं आणि फ्रेश होऊन पुढची वाट चालायला सुरुवात केली.
थंडीमुळे आखडलेले अवयव सावरुन आधीचा स्पीड पकडायला थोडा वेळ लागला. आम्ही जिथे थांबलो होतो तिथून डावीकडे जाणारी वाट तासाभरात थेट मंदिराजवळ घेऊन जाते तर उजवीकडच्या वाटेने मंदिराकडे जायला ७ टेकड्या पार करून दोन-तीन तास लागतात. आम्ही अर्थात थेट मंदिराकडे जाणारी डावी वाट पकडली. साधारण चढणीची वाट जंगलात शिरली आणि वळणं घेत पुढे सरकू लागली. छोटी अनन्या दरम्यान बरीच थकलेली पण तिथं पोहोचल्यावर maggie खायला देणार या आशेवर तिला नेत होतो😂😂 आणि ती पण बिचारी त्याच आशेवर चढत होती. या वाटेवर लहान लहान पाण्याचे झरे आहेत त्यांचं पाणी पायाला लागलं आणि मंदिर जवळ आल्याची खात्री पटली. पंधरा वीस मिनिटांत च बालेकिल्ल्याला वळसा मारून मंदिराजवळ पोहोचलो आणि ६:३० च्या दरम्यान मंदिरासमोरच्या एका खोपटात समान उतरवलं. खरंतर तारामती शिखरावर सूर्योदय पाहायला जायचं ठरलं होतं पण सगळेच थकले असल्याने सर्वानुमते तो बेत रद्द केला आणि त्या खोपटातच आराम करायचा निर्णय घेतला. योग्या आणि प्रणव ला चुलीशेजारी झोपायला जागा मिळाली म्हणून त्यांचं भागत होतं पण बाकीचे कुडकुडत झोपी गेले. साधारण ७:३० वाजता जाग आली आणि तिथल्या मावशींना चहा आणि पोह्याचं सांगून सगळ्यांना उठवलं.
अर्ध्या तासात चहा नाश्ता करून आम्ही कोकणकड्याकडे निघालो. मंदिराच्या समोरून चं एक वाट थोडं वर चढून कोकणकड्याला भिडते. आता बर्यापैकी उजाडलं होत आणि बर्यापैकी झोप पण झालेली असल्याने एक छोटंसं टेपाड चढून आणि उतरून आम्ही कोकणकड्यावर पोहोचलो. भास्कर दादाच्या अंगणात बॅग्स ठेऊन कोकणकडा बघायला गेलो.
कोकणकड्यावर यायची ही माझी दुसरी वेळ होती. दोनच महिन्यापूर्वी आलो तेव्हा या कोकणकड्याने आणि हरिद्धीचंद्रगडाने अक्षरशः वेड लावलं. इथं आलो की सगळं विसरून फक्त कोकणकड्याची रुपडं डोळ्यात भरून घ्यावंस वाटतं. कोकणकड्याची उंची बघायची तर ती झोपून चं बघावी लागते. अर्धवर्तुळाकार आकाराचा साधारण अर्धा किलोमीटर परिघाचा तासलेला कडा, खाली बेलपाडा गाव त्यातून उजवीकडे वर येणारी दगडधोंड्यांची नळीची वाट आणि नाफ्ता उर्फ कोंबडा त्यामागून डोकावून बघणारा कालाडगड-वाकडी सुळका, त्यामागे आजोबा आणि डावीकडे रोहिदास आणि माकडनाळ. समोरून डावीकडे पसरत गेलेला माळशेज घाटाचा कॅनव्हास, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, नाणेघाट आणि खूप काही अगदी स्पष्टपणे दिसत होतं.
कोकणकड्याचं पोटभर रूप न्याहाळून आणि मनसोक्त फोटोग्राफी करून आम्ही परतीची वाट धरली.
साधारण अर्ध्या तासात अगदी रमत गमत मंदिराजवळ पोहोचलो. थेट मंदिरात नं जाता आधी केदारेश्वराच्या गुहेकडे गेलो. दोन महिन्यांपूर्वी आलो तेव्हाच्या पाण्याच्या तापमानात आणि आत्ताच्या तपमानात अजिबात चं फरक नव्हता. फ्रिज चं पाणी झक मारेल इतकं बर्फासारखं थंडगार पाणी त्यात एक खांबावर उभं ठाकलेलं शिवलिंग.
जितकं पाण्याच्या वर तितकं चं पाण्याखाली, जे दिसत होतं ते केवळ अद्भुद होतं. थंडगार पाण्यात डुबक्या मारून आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि कपडे बदलून मंदिरात आलो. महादेवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन गप्पा मारत बसलो.
इथून तारामती शिखरावर दिसणारा भगवा हात दाखवून बोलावल्यासारखा फडफडताना दिसत होता, जायची इच्छा तर होती पण आता वेळ कमी होता. लांबून च त्याला राम राम करत परतीच्या वाटेला लागलो.
रात्री चढताना सगळ्यांची झालेली दमछाक बघता प्रणव आणि योग्याने टोलार खिंडीतून उतरून बाकी समान घेऊन कल्याण मार्गे आणि बाकीच्यांनी पाचनई मार्गे उतरून कसारा मार्गे जायचं ठरलं. त्याप्रमाणे प्रणव आणि योग्या मंदिरापासून उजव्या बाजूला तर आम्ही डाव्या वाटेला लागलो.
सर्वात सोपी समजली जाणारी हरिश्चंद्रगडाची वाट म्हणजे ही पाचनई ची वाट. सौम्य उताराची ही वाट हरिश्चंद्रगडाचं एक वेगळंच रूप दाखवते. मंदिराच्या मागून निघणारी मंगळगंगा नदीचं खोर सोबत होतं. तिच्या खोऱ्यातून सावकाश उतरत होतो. थोडं पुढे आलो तेव्हा मंगळगंगा डावीकडे ठेवून उजवीकडे कातळाला चिकटून जाणाऱ्या वाटेकडे वळलो. डाव्या बाजूला मंगळगंगेच खोरं आणि उजवीकडे भलामोठा डोंगर आणि त्या डोंगऱ्यात कोरलेल्या भल्या मोठ्या कपारी. त्याच कपारीत लिंबू सरबत आणि काकडी विकायला बसलेल्या एका आजीबाईंकडून लिंबू सरबत आणि काकडी घेत छोटा ब्रेक घेतला.
या ट्रेक ला आता २ वर्ष होतील, त्यानंतर सुद्धा एकदा टोलार खिंडीतून चढाई-उतराई केली. प्रत्येक वेळी हरिश्चंद्रगड त्याला ट्रेकर्स ची पंढरी ही दिलेली उपमा सार्थ करून दाखवतो. प्रत्येक वेळी मनात घर करून बसतो तो कोकणकडा, प्रत्येक भेटीत तो आपलं रांगड आणि अनोखं रूप दाखवतोच. इथे येऊन गेलेला कोणीही पुन्हा कधीही कोकणकड्यावर आणि हरिश्चंद्रगडावर यायला तयार असतोच.

Clockwise योग्या, अनन्या, मी, शुभम, प्रणव, अजिंक्य, उन्मेशा, पंकज, रूपा दि
साधारण अर्ध्या तासात अगदी रमत गमत मंदिराजवळ पोहोचलो. थेट मंदिरात नं जाता आधी केदारेश्वराच्या गुहेकडे गेलो. दोन महिन्यांपूर्वी आलो तेव्हाच्या पाण्याच्या तापमानात आणि आत्ताच्या तपमानात अजिबात चं फरक नव्हता. फ्रिज चं पाणी झक मारेल इतकं बर्फासारखं थंडगार पाणी त्यात एक खांबावर उभं ठाकलेलं शिवलिंग.
जितकं पाण्याच्या वर तितकं चं पाण्याखाली, जे दिसत होतं ते केवळ अद्भुद होतं. थंडगार पाण्यात डुबक्या मारून आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि कपडे बदलून मंदिरात आलो. महादेवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन गप्पा मारत बसलो.
इथून तारामती शिखरावर दिसणारा भगवा हात दाखवून बोलावल्यासारखा फडफडताना दिसत होता, जायची इच्छा तर होती पण आता वेळ कमी होता. लांबून च त्याला राम राम करत परतीच्या वाटेला लागलो.
रात्री चढताना सगळ्यांची झालेली दमछाक बघता प्रणव आणि योग्याने टोलार खिंडीतून उतरून बाकी समान घेऊन कल्याण मार्गे आणि बाकीच्यांनी पाचनई मार्गे उतरून कसारा मार्गे जायचं ठरलं. त्याप्रमाणे प्रणव आणि योग्या मंदिरापासून उजव्या बाजूला तर आम्ही डाव्या वाटेला लागलो.
सर्वात सोपी समजली जाणारी हरिश्चंद्रगडाची वाट म्हणजे ही पाचनई ची वाट. सौम्य उताराची ही वाट हरिश्चंद्रगडाचं एक वेगळंच रूप दाखवते. मंदिराच्या मागून निघणारी मंगळगंगा नदीचं खोर सोबत होतं. तिच्या खोऱ्यातून सावकाश उतरत होतो. थोडं पुढे आलो तेव्हा मंगळगंगा डावीकडे ठेवून उजवीकडे कातळाला चिकटून जाणाऱ्या वाटेकडे वळलो. डाव्या बाजूला मंगळगंगेच खोरं आणि उजवीकडे भलामोठा डोंगर आणि त्या डोंगऱ्यात कोरलेल्या भल्या मोठ्या कपारी. त्याच कपारीत लिंबू सरबत आणि काकडी विकायला बसलेल्या एका आजीबाईंकडून लिंबू सरबत आणि काकडी घेत छोटा ब्रेक घेतला.
Anticlockwise शुभम, अजिंक्य, उन्मेशा रूपा दि, छोटी अनन्या, पंकज आणि मी
साधारण दहा-पंधरा मिनिटांत पुन्हा चालायला सुरुवात केली. कपारीतून पुढे आल्यावर उतार थोडा तीव्र झाला आणि एकमेकांना आधार देत रेलिंग जवळ पोहोचलो. तिथून आस्ते कदम करत खाली पाचनई मध्ये पोहोचलो तेव्हा 4 वाजले होते. गावातल्या एका हॉटेलमध्ये बॅग्स टेकवल्या आणि थोडी पेटपूजा करून कसारा ला जाण्यासाठी काही सोय आहे का ते विचारायला बाहेर आलो. तिथल्या रोजच्या बस चा पत्ता नव्हता आणि असता तरी आम्हाला ते खूप उलटसुलट झालं असतं त्यामुळे एखादी टमटम मिळते का तीच्या शोधात होतो. पण तिथे उभ्या असलेल्या टमटम कोणत्या ना कोणत्या ग्रुप ने बुक करून ठेवलेल्या होत्या. टमटम शोधण्यात एक-दीड तास वाया गेला. पुन्हा हॉटेल वर येत होतो तेव्हा एक जीप वाले काका दिसले त्यांना विचारलं कसारा ला सोडणार का तर लगेच तयार झाले. सगळ्यांना घेऊन निघेपर्यंत ६ वाजले आणि बसल्या बसल्या काकांना सांगितलं ८:१५ ची लोकल पकडायची आहे जमलं तर जमवा. काकांनी पण दनादन गाडी चालवत राजूर-भंडारदरा-वसाळी-घोटी मार्गे पाचनई ते कसारा हे १०० किलोमीटर चे अंतर २ तासात पार करून ८ वाजता कसारा ला पोहोचवलं. आरामात तिकीट काढून लोकल मध्ये टेकलो आणि हरिश्चंद्रगडाचा हा आणखी एक अनुभव घेऊनचं परतीची वाट धरली.या ट्रेक ला आता २ वर्ष होतील, त्यानंतर सुद्धा एकदा टोलार खिंडीतून चढाई-उतराई केली. प्रत्येक वेळी हरिश्चंद्रगड त्याला ट्रेकर्स ची पंढरी ही दिलेली उपमा सार्थ करून दाखवतो. प्रत्येक वेळी मनात घर करून बसतो तो कोकणकडा, प्रत्येक भेटीत तो आपलं रांगड आणि अनोखं रूप दाखवतोच. इथे येऊन गेलेला कोणीही पुन्हा कधीही कोकणकड्यावर आणि हरिश्चंद्रगडावर यायला तयार असतोच.

Comments
Post a Comment